औरंगाबाद जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा -लक्ष्मण शेलार


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन):--- पैठण तालुक्यात व औरंगाबाद जिल्ह्यात आतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मका, बाजरी, सोयाबिन, उडीद, मूग, कांदा इत्यादी पिके पावसामुळे वाहून गेली आहेत. पावसान शेतक-यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. गोदावरी नदी काठची संपूर्ण शेती उत्पन्न वाहून गेले आहे.
यामुळे संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हा ओला दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय क्रांती सेने पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना मागण्यांचे  निवेदन दिले आहे. मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष प्रा.संतोष तांबे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार, तालुका उपप्रमुख गणेश औट, युवा शहर प्रमुख गणेश डूलगज, शहरप्रमुख विद्यार्थी आघाडी ,सिद्धार्थ बागुल, शहर चिटणीस, चौराख फारुख आदींच्याया स्वाक्षऱ्या आहेत

Post a comment

0 Comments