राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

कोल्हापूर : राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. 

सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या आधी केलेल्या मागण्या आता पूर्ण कराव्यात,असं खोत यांनी म्हटले. शरद पवार यांनी २०१९  ला सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आता या सरकारचे सूत्रधार असलेले पवारसाहेब ती मागणी विसरले आहेत का की त्यांच्या लक्षात आहे, हे शेतकऱ्यांना पाहायचं आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Post a comment

0 Comments