शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत - मंत्री बच्चू

अमरावती : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असं आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं. 

बच्चू कडू यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतल्याने, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं त्यांनी नमूद केलं

Post a comment

0 Comments