नाशिक - मुंबई प्रवास अडीच तासात पूर्ण होणार - हेमंत गोडसे

समृद्धी महामार्ग आणि नाशिक - मुंबई महामार्ग जोडण्यात येणार असून यामुळे नाशिक मुंबई प्रवासाला लागणारा कालावधी केवळ अडीच तासांवर येणार असल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटलंय. 

पुलाद्वारे हे दोन्ही महामार्ग जोडले जातील. शिवाय वडपे ते गोंदेदरम्यान महामार्ग सहा पदरी करण्याचा प्रस्तावही लवकर मंजूर होणार असल्याचं गोडसेंनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या उड्डाणपुलासाठी 48 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे.प्रवासाचं अंतर कमी झाल्याने उद्योगाला चालना मिळणार असल्याचंही हेमंत गोडसे म्हणाले.

Post a comment

0 Comments