नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये, रावसाहेब दानवेंचा सल्ला

औरंगाबाद :भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसेंचा उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नये, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. गेल्या ४ दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करणार आहेत. 

नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Post a comment

0 Comments