तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'गोगी'ला गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई:- तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह याला काही गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी समयने मुंबईच्या बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
समय शाहने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घराजवळ कधी एक गुंड तर कधी गुंडांचा ग्रुप मिळून त्याला शिवीगाळ करायचे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचे. काही दिवसांपूर्वी समय शूटिंगहून घरी परतत असताना त्याला या गुंडांनी रोखले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समयने घटनास्थळावरुन पोलिसांना फोन केला असता, पोलिस तिथे पोहोचेपर्यंत गुंडांनी तेथून पळ काढला. मात्र जाताना ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी त्यांनी समयला दिली.

Post a comment

0 Comments