कोकणातील तरुणाचा आधुनिक शेतीचा निर्णय, माळरानावर काजूची लागवड

रत्नागिरी- कोरोनाच्या संकटात अनेकांनां नोकऱ्या गमावाव्या लागल्या. मुंबईत कोकणातून नोकरीसाठी गेलेल्या तरुणांनाही याचा फटका बसला त्यांचीही परिस्थिती वेगळी नाही. नोकरी गेल्यांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगांव या गावातील विराज मोरे या उच्चशिक्षित तरुणाने आपल्या गावाकडे जाऊन आधुनिक शेती केलीय. एक एकर जमिनीत हळद लागवडीसह १५ एकरामध्ये आंबा आणि काजूच्या रोपांची लागवड केलीय. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्यावर खचून न जाता गावाकडे उत्पान्नाचा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करताना मित्रांचीही मदत घेतली. 
लॉकडाऊनच्या संकटात विजय मोरे यांनी गावाकडेच आनंदी जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी निवडला. टाळेबंदीच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. कित्येक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र ,अशा संकटाच्या काळाकडे विराज मोरे यानं संधी म्हणून बघितलं.विराज मोरे याचे मूळगाव कोकणातले मात्र आतापर्यंत तो गावाकडे गेला नव्हता. विराजचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे.

Post a comment

0 Comments