कुरकुभं औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षा विभागाचे अधिकारी अखिल घोगरे यांची उचलबांगडी करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी...


निलेश जांबले दौंड-पुणे...

कुरकुभं औद्योगिक वसाहतीमधील जळीतकांडस औद्योगिक सुरक्षा विभागच जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे.

कुरकुभं उद्योगिक वसाहतींमधील शिवशक्ती आॅक्सिलेट प्रा.लि‌ या कंपनीला आज पहाटे पावणे‌ दोनच्या  सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अंदाजे 1000ते 1200 मेट्रीक टनापेक्षा जास्त एवढे केमीकल जळुन खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला जात आहे...
मात्र औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी घटनास्थळी भेट दिली मात्र माध्यम प्रतिनिधींशी न बोलताच पळ काढला. त्यामुळे अशा अवैद्य नियम बाह्य  कंपनीवरती अखिल घोगरे यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे...
तर संभाजी ब्रिगेड दौंड तालुका यांच्या कडुन घोगरे यांची उचलबांगडी करण्याची मागणी तालुका अध्यक्ष सुनील पासलकर यांनी केली आहे अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे...

....तर घटनास्थळी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी भेट देऊन यापूर्वी ही आपण अशा उद्योगांनवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात व प्रशासकीय पातळीवर केली आहे यापुढे ही करणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले...

सदर घडलेल्या घटनेची चौकशी होऊन गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.परतु औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी घोगरे असे सांगतात की असा गुन्हा दाखल करण्यास वेळ लागतो. व किती नुकसान झाले हे सांगणे शक्य नाही. त्यामुळे सत्य समोर येण्याची गरज आहे... या औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार रात्रीचीच कंपनीला आग लागली जाते त्यामुळे विमा कंपनीच्या संरक्षित कवचाच्या माध्यमातून तोट्यामध्ये चाललेले व्यवसायात वाचवण्यासाठी अशी जळीतकांड केली जात आहेत का असे प्रश्न स्थानिकांना पडत आहेत...

Post a comment

0 Comments