उस्मानाबादेत ११ वर्षीय बालिकेवर गँगरेप, चौघा अल्पवयीन तरुणांवर गुन्हा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात ११ वर्षीय बालिकेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार अल्पवयीन तरुणांना उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन तरुणी मंदिराजवळ खेळत असताना निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले होते. 

नवरात्रौत्सवात नारी शक्तीचा जागर सुरु असताना तुळजाभवानीच्या उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर या गावात घटना घडल्याचं दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. चारही आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. 

Post a comment

0 Comments