देशभरात पोलीस स्मृतीदिन सभारंभ, अमित शाह, उद्धव ठाकरेंकडून शहीद पोलिसांना श्रद्धांजली

मुंबई:- भारतीय सैन्यातील जवानांप्रमाणेच कर्तव्य बजावताना देशातील पोलिसांनी केलेल्या बलिदानाचं स्मरण करणारा दिवस म्हणजे २१ ऑक्टोबर.संपूर्ण देशभरात हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी शहीद पोलिसांनी श्रद्धांजली वाहिली जाते.या निमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीद पोलिसांनी श्रद्धांजली वाहिली.तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील नायगाव येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ पार पडला.तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील नायगाव येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ पार पडला.
यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात विविध पोलिस दलांमधील 26 पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली आणि या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

Post a comment

0 Comments