गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, भाजप आक्रमक

अमरावती :महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने गुन्ह्यात दोषी ठरवलेल्या मंत्र्यांला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. तसंच यशोमती ठाकूरांच्या राजीनाम्यासाठी भाजप जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने 2012च्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात 3 महिने व 15 हजार रुपयांची शिक्षा सुनावली होती, त्यात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर आरोप करत मला बदनाम करण्याचे छडयंत्र असल्याचा आरोप केला होता, यावर आज अमरावतीत श्रमिक पत्रकार भवनात भाजपने पत्रकार परिषद घेत यशोमती ठाकुर यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर हल्लाबोल केला.यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे तर त्यांनी स्वत:च या प्रकरणात आपली नातिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा होता. मात्र तो त्यांनी दिलेला नाही. म्हणूनच भाजप आज त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आंदोलन करेल, असं शिवराय कुलकर्णी म्हणाले. अमरावतीत यशोमती ठाकुर यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून आता भाजप विरुद्ध यशोमती ठाकूर हा वाद आता चांगलाच पेटला आहे.


Post a comment

0 Comments