गुणवत्ताहीन किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार, आरोग्यमंत्र्यांचा गैरसमजही दूर करणार- देशमुख

जालना: कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RTPCR टेस्ट किट्स या केंद्र सरकारच्या ICMR या संस्थेनं निर्धारित केलेल्या पुरवठादारांकडून राज्याला मिळाल्या आहेत. या किट्स वैद्यकीय शिक्षण विभागानं खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना गैरसमज झाला आहे. त्यांच्याशी चर्चा करुन तो दूर करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच 
गुणवत्ताहीन किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार, आरोग्यमंत्र्यांचा गैरसमजही दूर करणार- देशमुख
जालना: कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RTPCR टेस्ट किट्स या केंद्र सरकारच्या ICMR या संस्थेनं निर्धारित केलेल्या पुरवठादारांकडून राज्याला मिळाल्या आहेत. या किट्स वैद्यकीय शिक्षण विभागानं खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना गैरसमज झाला आहे. त्यांच्याशी चर्चा करुन तो दूर करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असताना दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RTPCR च्या तब्बल १२ लाख ५० हजार किट्स सदोष असल्याची कबुली आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. 
राज्य सरकारनं खरेदी केलेल्या GCC कंपनीच्या टेस्ट किट्स सदोष असल्याचा अहवाल एनआयव्हीने दिला. वैदयकीय शिक्षण मंत्रालयाकडून या किट्सची खरेदी करण्यात आली होती. GCC कंपन्यांच्या किट्सचा वापत तात्काळ थांबवण्यात आला आहे. सदोष किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. त्यावर बोलताना अमित देशमुख यांनी टोपे यांचा काही तरी गैरसमज झाला असल्याचं म्हटलं.

Post a comment

0 Comments