यवत गाव कामगार तलाठी "कैलास भाटे" यांची उचलबांगडी करा... पंचायत समिती सदस्य निशा शेंडगे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

..
निलेश जांबले
दौंड पुणे... दिनांक १४/१०/२०२०
यवत गाव कामगार तलाठी कैलास भाटे हे अकार्यक्षम व उध्दट असल्याने त्यांची तात्काळ बदली करा अशी मागणी दौंड पंचायत समितीच्या सदस्य निशा शेंडगे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे...
यवत गावातील अनेक शेतकरी यांचे नोंदी, वारस नोंद, विहीर नोंदी, उत्पन्न दाखला, अन्य शासकीय कामे करण्यास कैलास भाटे हे टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. यासंबंधात वारंवार तक्रारी येत असून संबंधित कर्मचाऱ्यांनी संपर्क केला असता उद्घाटनाचे बोलणे करतात.तसेच राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती आवाक्याबाहेर असतानाही ग्रामस्थांना कोणतेही सहकार्य करत नाहीत. माहिती देण्यास टाळाटाळ करतात, तसेच वेळेवर कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे त्यांची त्वरित बदली होऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निशा शेंडगे यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments