पैठणच्या नाथसागर जलाशयात मगरीचा मुक्त संचार,पाण्यात पोहण्यासाठी प्रशासनाकडून नागरीकांना सक्त मनाईपैठण प्रतिनिधी विजय खडसन :-- 

पैठण येथील नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने या पाण्यात मगर व अन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्यामुळे धरणाच्या पाण्यात पर्यटक व नागरिकांनी पोहण्यास व पाण्यात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे.

   येथील नाथसागर धरणाच्या नियंत्रण कक्षाच्या पाठीमागे असलेल्या धरणाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 फूट लांबीची मगर या ठिकाणी असलेले पोलीस व सुरक्षारक्षकाला आढळून आले आहे. या पूर्वी ही मगरीने २७ गेटच्या आतील बाजूस दर्शन दिले होते,  त्यामुळे धरणामध्ये पोहण्यासाठी व पाण्यामध्ये उतरण्यास नागरिक, शेतकरी, व पाणी लाभधारक यांना सुचित करून या परिसरात जानवरे घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेले असून यातून गोदावरी नदीमध्ये 13 हजार 624 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Post a comment

0 Comments