विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त.औरंगाबाद दि, १० शनीवार : पोलीस स्टेशन चिकलठाणा ,औरंगाबाद ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक १०/१०/२०२० रोजी सापळा रचून एका अल्पवयी तरूणाला एक गावठी कट्टा पिस्टल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुसासह  पकडले आहे. 
पोलीस स्टेशन चिकलठाणा ,औरंगाबाद ग्रामीण येथील पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली कि , वरुड काजी ते गंगापुर जहागीर रोडने एक इसम निळ्या रंगाचे मोटार सायकवर बसुन गावठी कट्टा पिस्टल घेवुन जात आहे.अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस व पंच असे गंगापुर जहागीर शिवारात सारा स्वपनांगन सोसायटी जवळ रोडवर जावुन थांबलो असता ० ९ .१० वाजता एक इसम वरुड कडुन गंगापुर जहागीर कडे येत असतांना दिसल्याने नमुद इसमास पंचा समक्ष थांबवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव व वय १८ वर्षे असे सांगीतले.त्यावेळी पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा पिस्टल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुस व दोन मोबाईल , त्याचे ताब्यातील निळ्या रंगाची शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच .२० ई.व्हि.९९ ८० असा एकुण ९ १,००० / -रुपयेचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्याचा सविस्तर जप्ती पंचनामा करुन नमुद मुलाचे वयाबाबत पुरावा हस्तगत करुन खात्री केली असता त्याचे वय साडेसतरा वर्षे असे असल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालका विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

Post a comment

0 Comments