पाटस मंडळ अधिकारी म्हस्के व तलाठी दिवेकर यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल.


(निलेश जाबंले)दौंंड, पुणे -तक्रारदारास शिवीगाळ,दमदाटी, करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी देऊन पाटस मंडल अधिकाऱ्यांनी आपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन दाखवून दिले आहे...
पाटस येथील प्रशांत बबन‌ ठोंबरे व सुहास बबन ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर, माननीय तहसीलदार दौंड यांना मंडळ अधिकारी व गाव कामगार तलाठी पाटस विरोधात तक्रार अर्ज दिला आहे...
    उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर यांच्याकडून अधिनियम १९६६चे कलम २४७ आरटीएस अपील दाखल करून, त्याकामी मंडलाधिकारी पाटस यांचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच सदर आपिलासोबत स्थगिती अर्ज देऊन मंडलाधिकारी पाटस यांचे आदेशास स्थगिती देण्याची मागणी केली होती. सदर आपिला सोबत स्थगिती अर्जाचे कामकाज चालुन सदर प्रकरणी वस्तुस्थिती पाहता व त्यातील कागदपत्रांचे अवलोकन करता मंडलाधिकारी पाटस यांच्या आदेशा प्रकरणी सदर प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारीनी दिले होते‌.मात्र मंडळ अधिकारी व गाव कामगार तलाठी पाटस यांनी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचा अवमान करत बेकायदेशीरपणे नोंद करून अर्जदार यांच्या सातबारा पत्रकी नोंद केल्याने ठोंबरे कुटुंबाच्या हक्कावर गदा आली असून,आर्थिक शारीरिक, मानसिक, त्रास झाला आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी व पाटस गाव कामगार तलाठी यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे ठोंबरे कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे....

Post a comment

0 Comments