दोन वाहनांच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई -पुणे महामार्गावर दोन वाहनांची भीषण धडक झाली आहे. या अपघातामध्ये गस्त घालत असलेल्या सचिन सोनवलकर या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळे सचिन सोनवलकर यांना जबरदस्त मार लागला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्रीच्या सुमारात गाड्यांचा अपघात झाला. यावेळी पोलीस कर्मचारी हे ड्युटीवर होते. सचिन यांची गाडी ट्रकच्या चाकाखाली अडकली आहे.
घटनास्थळावरून सचिन यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतुक विभागाचे पनवेल पळस्पाचे सर्व अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. ठाणे वाहतुक विभागाचे अधिक्षक दिगंबर प्रधान यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

Post a comment

0 Comments