किशोर बलांडे यांचे राजकारण सामान्यांसाठी - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 फुलंब्री ( प्रतिनिधी ) दि.3, माजी सरपंच माणिकराव बलांडे यांचे राजकारण हे सर्वसामान्यांसाठी कायम राहिले आहे. तीच प्रथा किशोर बलांडे पुढे चालवीत आहे. एक अभ्यासू व कर्तव्यदक्ष बांधकाम सभापती म्हणून किशोर बलांडे यांचे नाव लौकीक आहे. नागरी समस्या, सुविधा इत्यादी मुद्द्यांकडे प्रमाणिकपणे लक्ष देऊन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करा. शिवसेनेने सामन्यातील सामान्यांना आमदार, मंत्री करण्याचे काम केले आहेत. त्यामुळे 'मातोश्री ' न्याय देण्यासाठी कधी कमी पडत नाही. आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा करा आपले राजकारणातील भविष्य प्रगतशील असेल असे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले.

   जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किशोर बलांडे यांना शुभेच्छा देत असतांना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.

    यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड ,जि.प.चे माजी अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य धनराज बेडवाल ,रमेश गायकवाड , जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन गोकुलसिंग राजपूत, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे ,बाजार समितीचे संचालक नामदेव काळे संजय वाळके ,सतीष ताठे, सिल्लोड पंचायत समिती सदस्य निजाम पठाण,सिल्लोड चे नगरसेवक प्रशांत शिरसागर, अमित वाहुळ यांच्यासह बापू पाटील ,रमेश दुतोंडे, बापूराव म्हस्के,जगन्नाथ पवार, राधाकिसन कोलते,अंकुश ताठे, भाऊसाहेब कोलते ,नवनाथ वाघदरे,आप्पा काकडे आदींची उपस्थिती होती.

    पुढे बोलतांना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की ,फुलंब्री तालुक्यात नागरिकांच्या समस्या व प्रश्न वाढत जात आहेत. आणि त्यावर आजही योग्य तो निर्णय घेतांना उशीर होतो. मात्र या सर्वांवर किशोर बलांडे अनेक समस्यांचा योग्य तो तोडगा शोधतांना दिसत आहेत. त्यामुळे प्रस्थापित नेतृत्वावरील विश्वास आता उडालेला असल्याचा टोला ना. अब्दुल सत्तार यांनी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना नाव न घेता लगावला.
उत्तर प्रदेशातील बलात्कार घटनेवर बोलत असतांना ना. अब्दुल सत्तार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. गुजरात दंगली दरम्यान माजी दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाचपेयीं यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळा असे निर्देश दिले होते. आज उत्तर प्रदेश मधील घटनेत केंद्र व उत्तर प्रदेश सरकारची ही पारदर्शक भूमिका दिसत नसल्याने पीडितांचा आवाज दाबल्या जात असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि. प. अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे यांनी केले सूत्र संचलन अंकुश ताठे यांनी तर शेवटी कृउबा समितीचे सभापती चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.

Post a comment

0 Comments