पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला

बीड: दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. त्यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, भाजपच्या राज्य कार्यकारिणीत न लागलेली वर्णी, राष्ट्रीय कार्यकारिणीत मिळालेली संधी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासाथीने भाजप वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला दिलेली सोडचिठ्ठी या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या खास शैलीत तडाखेबंद भाषण केलं

Post a comment

0 Comments