फी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार

ठाणे : कल्याणच्या टिटवाळा भागात मेरीडीयन शाळा प्रशासन आणि पालक वर्ग यांच्यात विद्यार्थ्यांची फी माफी करावी यासाठी चांगलीच झुंपली होती. फी माफीसाठी स्थानिक भाजप नगरसेविकेने तीन-चार पालकांसह शाळेसमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनास आजूबाजूच्या सोसायटीतील नागरीकांनी थाळीनाद करीत समर्थन दिलं. त्यामुळे अखेरीस शाळेला नमतं घ्यावं  लागलं. शाळेने विद्यार्थ्यांची फी 30 टक्के कमी केली आहे. 

शाळेची फी कमी करावी यासाठी टिटवाळ्याच्या मेरीडीयन शाळा प्रशासन आणि पालक वर्ग यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु होते. कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींची पगारकपात झाली, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे पालक वर्गाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशा परिस्थितीत फी कुठून भरायची? असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. त्यामुळे शाळेने फी कमी करावी, अशी मागणी शाळा प्रशासनाकडे केली होती.

Post a comment

0 Comments