१०-१० च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश- एकनाथ खडसे

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे कालच मुंबईत आले आहेत. ते आज शरद पवारांना भेटणार असून राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Post a comment

0 Comments