पांढरे सोन्याच्या परतीच्या पावसाने वळल्या वाती शेतकरी राजा चिंतेतपैठण प्रतिनिधी विजय खडसन :---

 पैठण तालुक्यात गेल्या दोन-तिन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरीराजावर संकट कोसळले आहे.

सततच्या पावसामुळे पैठण तालुक्यातील पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाले. पावसामुळे जमिनीलगतच्या बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात पाऊस थांबला नसल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीला देखील कोंब फुटले असून शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करून सुद्धा घरात एक कापूस न आल्याने शेतक:यांनी डोक्याला हात मारुन घेतला आहे. अशाच प्रकारे उडीद, मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी आपल्याला तारतील, असे शेतक:यांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतक:यांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी फिरले आहे. तसे पाहिले तर परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. परंतु, पाऊस सुरू असल्याने शेतक:यांना काढता आला. नाही. डोळ्यादेखत मोठा कष्टाने उभ्या केलेल्या पैठण तालुक्यातील शेतक:यांच्या डोळ्यादेखत खरीप हंगामातील पीकांची राखरांगोळी होत आहे.

शेतक:यांनी दसरा झाल्यानंतर पावसाची उघडीप मिळताच सोयाबीनची कापणी करण्याची घाई केली होती. मात्र, त्यांना कापलेले पीक उचलण्याची सवडही शेतकरीराजाला पावसाने दिली नाही. त्यामुळे जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवले आहे.खरिप हंगाम आटोपताच शेतकरी रब्बीसाठी नियोजन करीत असतो, मात्र यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे खरिप पीकांची काढणीच लांबली. परिणामी रब्बी हंगामातील पेरण्याही लांबत आहे. मशागतीसह अनेक कामे रखडली असून बाजरी, ज्वारीसह हरभरा पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याची पावसाने दुरवस्था केली. कापूस फुटताच वेचणीअगोदर वाती होत आहेत. हातात चार पैसे मिळण्याऐवजी खर्चही वसूल होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे आर्थिक समीकरण बिघडले आहे.

संजय पा. मोरे ...शेतकरी कातपुर ता.पैठण

Post a comment

0 Comments