दौंड भाजपाचा तानाजी दिवेकर हा सुनेचा विनयभंग करणारा नराधम मोकाट... तालुक्यातील महिला नेत्या गप्पच...


निलेश जांबले
 दौंड-पुणे...
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सरचिटणीस, स्वयंघोषित समाजसेवक,नराधम तानाजी संभाजी दिवेकर याच्यावर सुनेवर विनयभंग केल्याप्रकरणी यवत (दौंड) पोलिस ठाण्यात सोमवार दिनांक ५.रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनेचा विनयभंग करुन  छळ केल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवूनही,यवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी वर्गाला अद्याप हा नराधम गजाआड करता आला नाही.मात्र तालुक्यातील कोणत्याही प्रश्नावर आक्रमक होणा-या महिला नेत्या का गप्प आहेत असा सवाल तालुक्यातील महिला करत आहेत.. त्यामुळे या नाधमास या प्रकरणी राजकीय साथ मिळतेय की काय अशी चर्चा आता परिसरात होवू लागली आहे, 
तानाजी दिवेकर या नराधमाने सुनेवर अत्याचार,विनयभंग,करत माहेरी असलेली मालमत्ता मिळवण्यासाठी  दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देऊनही गुन्हेगार मोकाट असेल तर महाराष्ट्रातील दौंड तालुक्यातही हाथरस सारखे बलात्कार- विनयभंग-करुन जिवे मारण्याचं कांड घडु शकतेय त्यामुळे सदर प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली जात आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी संभाजी दिवेकर,मालन तानाजी दिवेकर, पंकज तानाजी दिवेकर, मंदार तानाजी दिवेकर सर्व राहणार वरवंड तालुका दौड जिल्हा पुणे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
याप्रकरणी यवत (दौंड) पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल असे सांगण्यात आले...

Post a comment

0 Comments