चाय-बिस्कुट' खातील, पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत : रोहित पवार

मुंबई :   हाथरस प्रकरणात बेजबाबदार वार्तांकन करणाऱ्या माध्यमांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे. विशिष्ट माध्यम संस्थांकडून केली जाणारी पत्रकारिता पाहिली तर ती कोणत्या दिशेला चाललीय?, असा उद्विग्न सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. तसंच ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण मराठी पत्रकार प्रामाणिकपणा विकणार नाहीत, असं मतंही त्यांनी व्यक्त केलंय.

रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामीचा व्हिडीओ पोस्ट करत, “पीडितेची बातमी दाखवण्याऐवजी खोट्या बातम्या तयार करण्याची नवीन पत्रकारीताच त्यांनी सुरू केलीय. ते तुम्ही सोबतच्या व्हिडीओत पाहू शकता. याला पत्रकारितेऐवजी सर्कस म्हणणंच अधिक संयुक्तिक ठरेल”, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केलाय.
यापेक्षा कितीतरी अधिक उत्तम माझे मराठी आणि महाराष्ट्रात काम करणारे इतर पत्रकार मित्र आहेत. जे ‘चाय-बिस्कुट’ खाऊन राहतील पण आपला प्रामाणिकपणा कधीही विकत नाहीत”, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलंय. त्याचसोबत रोहित पवार यांनी एबीपी न्यूजच्या पत्रकार प्रतिमा मिश्रा यांचं कौतुक केलंय. “प्रतिमा मिश्रा या हिंदी माध्यमाच्या पत्रकार भगिनीची कामगिरीही अभिमान वाटावी, अशी आहे.

Post a comment

0 Comments