नावरात्रीच्या सहाव्या माळीच्या रंगाचं महत्व.

औरंगाबाद (योगिता बनसोडे):- नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. 
पिवळा रंग हा दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचा सर्वात आवडता रंग आहे. भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पावून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते असे समजण्यात येते. पिवळा रंग हा अग्रेसर असून उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा हा आवडता रंग असून याला पाचव्या दिवशी परिधान करण्याचे महत्त्व आहे. लौकिक, सांसारिक बंधनातून मुक्त होऊन उपासना करण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते. या देवीच्या पूजेसाठीदेखील पिवळ्या फुलांचा वापर करण्यात येतो.
 पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. घरात सुखशांती, समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते. सतत प्रसन्न वाटण्यासाठी या पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी प्राप्त झाले आहे. स्कंद अर्थात कुमार कार्तिकेय यांचं दुसरं नाव आहे. प्रसिद्ध देवासुर युद्धात देवांचे सेनापती म्हणून कार्तिकेय यांनी काम पाहिले होते. पुराणात सांगितल्यानुसार कुमार आणि शक्ती अशी यांची महिमा आहे. या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता म्हटले जाते अशी आख्यायिका सांगण्यात येते.

Post a comment

0 Comments