पैठणमध्ये चित्रपटाला लाजवेल अशी बनवा बनवी पहिल्याच रात्री नवरीने नगदी रक्कम व सोने घेऊन ठोकली धूम


पैठण ( प्रतिनिधीं विजय खडसन )--

 पैठण शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या मुलाने आदल्या दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला . या कार्यक्रमात नवरदेवाला मुलगी पसंत पडल्याने तात्काळ 50 हजार रुपये नवरीला देऊन दुसऱ्या दिवशी लग्न करण्याचे ठरले . या लग्नाचा संपूर्ण खर्च 
नवरदेव मंडळीने करण्याचे ठरले व ठरल्या प्रमाणे लग्नही ठरले . लग्न झाल्याने  नवरदेव मंडळीसह सर्व नातेवाईक खुश झाल्याने आनंदात सर्व जण रात्री झोपले . या गाढ झोपीचा फायदा घेत नवरीने 50 हजार रुपये व घरातील सर्व सोने घेऊन पसार झाल्याची घटना पैठण शहरातील लक्ष्मीनगर भागात घडली . 
               या बाबत माहिती अशी की 
पैठण शहरातील लक्ष्मी नगर भागात  विधवा महिला व तिचा मुलगा येथे राहत होते . आपल्या  मुलाच्या लग्नासाठी एखादी मुलगी पहावी म्हणून तेलवाडी येथील एक व्यक्तीला मुलगी बघण्यासाठी  सांगितले . मध्यस्थ असलेल्या व्यक्तीने  शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जालना येथील एक अनोळखी निराधार  मुलगी शोधली.  व बाहेरील नाथ मंदिर परिसरात नवरी ,तिची बहीण, मेहुणा व , मध्यस्थ , नवरदेव मुलगा व त्याची आई   यांची लग्नाच्या बाबतीत एक बैठक झाली .  या बैठकीत मुलीला 50 हजार रुपये हुंडा देऊन मुलीच्या लग्नाचा खर्च हा नवरदेवाने करण्याचे ठरले . 
दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी दोघांचा
 धुमधडाक्यात विवाह पार पडला. लग्न झाल्याबरोबर नवरीची व मेहुणा यांनी ठरल्याप्रमाणे 50 हजार रुपये हुंडा घेऊन निघून गेले. त्यांच रात्री 
सासु व नवरा गाढ झोपलेले पाहून नवरीने अंगावरील सोने, पैसा व कपडे घेऊन मध्यरात्रीच धूम ठोकली.  सकाळी नवरी गायब झाल्याचे कळताच नवरदेवाच्या आईने पैठण पोलीस स्टेशनमध्ये नवरी पळून गेल्याची तक्रार दाखल केली .
 मुलाच्या घरच्या नागरिकांनी पैसा घ्यायचे व लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीने घर लुटून पळून जायचे .असा प्रकार सध्या महाराष्ट्रभर घडत आहे . पैठण शहरातच अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे .
लग्न करून , हुंडा घेऊन पळून जाणाऱ्या मुली सोबत मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख यांनी व्यक्त केली आहे .

Post a comment

0 Comments