या नव्या नियमाला DAC असं नाव देण्यात आलं आहे. म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड. आता फक्त बुकिंगवरच सिलेंडरची घरी पोहोचणार नाही तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला कोडही पाठवावा लागणार आहे. जर तुम्ही डिलिव्हरी बॉयला कोड सांगितला नाही तर तुम्हा सिलेंडरही मिळणार नाही. जर एखाद्या ग्राहकाने वितरका (Distributor) ला मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर डिलिव्हरी बॉयकडे एक अॅप असेल ज्याने तुम्ही तुमचा नंबर क्षणात अपडेट करू शकता.
– अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांचा पत्ता चुकीचा आहे आणि मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यामुळे सिलिंडर्सची डिलिव्हरीदेखील थांबवली जाऊ शकते.
– तेल कंपन्यां या प्रक्रियेला सगळ्यात आधी 100 स्मार्ट शहरांमध्ये लागू करणार आहे. जयपूरमध्ये याचा पायलट प्रोजेक्टही सुरू झाला आहे.
0 Comments