रायगडमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रायगड : रायगड येथे १६ वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदारनाने बलात्कार केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे घडली. याबाबत गुरुवारी (८ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजता पाली पोलीस स्थानकात ठेकेदारा विरोधात बलात्कार, अ‍ॅट्रोसिटी आणि पॉस्को अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या ठेकेदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व चौकशी करून शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सायंकाळी अटक केली जाणार आहे, असे पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले होते.
ठेकेदाराने 1 जानेवारी 2019 ते 6 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत अल्पवयीन आदिवासी मजूर मुलीवर वारंवार बलात्कार करून जातीवाचक शिवीगाळ करायचा. तसेच या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
याबाबत सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार पाली पोलीसांनी ठेकेदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी करत आहेत.

Post a comment

0 Comments