संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?; नारायण राणेंची टीका

मुंबई: शिवसेना २५ वर्षे सत्तेत राहील या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचा भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी समाचार घेतला. शिवसेना २५ वर्षे सत्तेत राहणार? कोणत्या धुंदीत आहात?, असा सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. 

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. काल संजय राऊत यांनी शिवसेना सत्तेतील पाच वर्षे पूर्ण करणार असं सांगितलं. त्यानंतर २५ वर्षे शिवसेना सत्तेत राहील असंही सांगितलं. दुसरीकडे आमचं सरकार पाडा असं आव्हानही दिलं. दिल्लीतून २०० कोटी आणा असंही म्हणाले. जणू काही दिल्लीतील नेते राऊत यांना विचारूनच निर्णय घेतात, अशा अविर्भावात ते बोलत होते, असा चिमटा राणे यांनी काढला. काय माणूस आहे हा? काय बोलतो? आधी म्हणतो २५ वर्षे राज्य करू, नंतर म्हणतो ५ वर्षे सरकार टीकेल. कोणत्या धुंदीत आहात? कोणत्या स्वप्नात आहात? की रिया चतुर्वेदींनी काय पाठवलं?, असे सवाल करतानाच संजय राऊत हे विदूषक आहेत. चेष्टेचा विषय झाले आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

Post a comment

0 Comments