१५ व्या वित्त आयोगातुन शहर स्वच्छतेवर खर्च करण्यास शासनची मान्यता पैठणचे नगरअध्यक्ष लोळगे यांच्या प्रयत्नाला यश पैठण प्रतिनिधी विजय खडसन :---

 चौदावे वित्त आयोग बंद झाल्याने पैठण शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यासाठी शहर स्वच्छतेसाठी १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास मान्यता द्यावी यासाठी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी सहसचिव पांडुरंग जाधव यांना निवेदन दिले होते.

 त्यांच्या प्रयत्नाला यांना यश आले असुन शासनाने १५ व्या वित्त आयोगातुन पैठण शहर स्वच्छतेवर खर्च करण्यास मान्यता दिल्याने आता शहर स्वच्छतेचे काम पुन्हा वेगाने सुरु होणार असल्याने पैठण शहराचा स्वछतेच  प्रश्न मार्गी लागला आहे. 
मान्यता मिळावी म्हणुन नगरअध्यक्ष लोळगे यांनी वित्त सहसचिव पांडुरंग जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला होता . तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील या संदर्भात दि . १४ सप्टेंबर रोजी पत्र लिहले होते व शासनाने २८ आक्टोबर रोजी एका पञ्कान्वये आधिसुचना जारी करत पंधराव्या वित्त आयोगातुन स्वच्छतेवर पन्नास टक्के , पिण्याचे पाणी व जलपुर्णभरनच्या कामावर पन्नास व टक्के निधी खर्च करण्यास मान्यता दिल्याने आता  शहर स्वच्छतेचा विषय मिटला असुन आता शहरात निधीच्या स्वच्छतेची कामे पुर्वपदावर येणार असल्याचे नगरअध्यक्ष सुरज लोळगे व मुख्यधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगीतले आहे .

Post a comment

0 Comments