भाजप वैद्यकीय सेल तालुका अध्यक्ष पदी डॉ रमेश आर्ले पाटील यांची निवडपैठण प्रतिनिधी विजय खडसन:---

पैठण तालुक़ा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष  डॉ. सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेलया बैठकीत
पैठण तालुका भाजपा वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्ष पदी डॉ.रमेश काकासाहेब आर्ले पाटील यांची नियुक्ती झाली आहे.नुकतेच डॉ.शिंदे यांनी त्यांना निवड़ीचे पत्र दिले.तालुक्यासह बाहेरही पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांची निवड केली आहे.यापुढेही पक्षसंघटन आणि पक्षवाढीसाठी कायम सक्रिय राहणार असल्याचे डॉ.आर्ले यांनी बोलताना सांगीतले.त्यांच्या निवड़ीबद्दल मा.रावसाहेब दानवे,मा.हरीभाऊ बागडे,खा.भागवत कराड,डॉ.सुरेश आर्ले,(दहिफळ शेवगाव) डॉ.आन्नासाहेब देशमुख (देवगाव,नेवासा) आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments