नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या

नागपूर : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षेला ग्रहण लागले आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षेत काही दिवसांपूर्वी तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता नागपूर विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. यामुळे त्या विषयाची परीक्षा नंतर घेतली जाईल, असे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. 
काल (९ ऑक्टोबर) झालेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान रिमोर्ट सर्वरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षा होऊ शकली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील रविवारी किंवा अन्य योग्य तारखेला घेण्यात येतील, असे परिपत्रक नागपूर विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत.

Post a comment

0 Comments