सांगली – आटपाडी तालुक्यातील मिटकी गावात असणारा पाझर तलाव फुटला आहे. जोरदार पावसामुळं तलावातील पाणी पातळीत वाढ झाल्यानं तलाव फुटला. तलावातून वाहून गेलेल्या पाण्यामुळे ओढया लगतच्या विहिरी मुजल्या. शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. चुकीच्या बाजूला सांडवा काढल्याने मिटकीचा पाझर तलाव वाहून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात झालेल्या जोरदार पावसामुळे आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा पाझर तलाव वाहून गेला आहे. या तलावात टेंभू योजनेचे पाणी येते. अचानक पाऊस पडल्याने तलावात पाणी भरपूर आल्याने तलाव फुटला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
0 Comments