अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

उस्मानाबाद: अतिवृष्टीमुळे गेल्या दहा दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून उद्या गुरुवारी आर्थिक मदत जाहीर होणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बळीराजाला दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मी आढावा घेतला आहे. मी इथे केवळ आकडे सांगायला आलो नाही. केवळ तुम्हाला बरे वाटावं म्हणून आकड्यांची फेकाफेक करणार नाही. आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत ८० ते ९० टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं समाधान होईल अशी मदत तुम्हाला केली जाईल. तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. तुमच्या सुखा समाधानासाठी जे जे करता येईल, ते मी करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

Post a comment

0 Comments