राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीतसाहसी शिक्षण अभ्यासक्रमासंदर्भात सादरीकरण


            मुंबई, दि. 21 : गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टीट्यूट ऑफ माऊंटनिंगपुणे या संस्थेचे  साहसी शिक्षण अभ्यासक्रम’ साठी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले.

            प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबतच साहस प्रशिक्षण हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईलअसे या सादरीकरणादरम्यान  सांगण्यात आले.

            राज्यमंत्री कु. अदिती तटकरे म्हणाल्यातंत्रज्ञानाच्या या काळात गॅझेट्सवर आपला जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांना गिर्यारोहणाच्या प्रत्यक्ष अनुभवातून इतिहासभूगोल या विषयाच्या अभ्यासाबरोबरच निसर्गाप्रती गोडी निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यानुसार या संस्थेमार्फत साहस प्रशिक्षण विषयक उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात यावा व त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारीप्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पहावे.

            या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उपसचिव श्रीमती नानलक्रीडा उपसंचालकरायगड जिल्हा क्रीडा अधिकारीशिक्षणाधिकारीरायगडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टीट्यूट ऑफ माऊंटनिंग या संस्थचे प्रमुख व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त गिरीप्रेमी श्री. उमेश झीर्पे  यांनी  सादरीकरण केले.

            गिर्यारोहण व जलदुर्ग ॲडव्हेंचर यादृष्टीने सह्याद्रीच्या वैभवशाली गडकिल्ल्यांनी समृद्ध असा रायगड जिल्ह्यातील रोहा आणि आजुबाजूचा परिसर आहे. ज्यामध्ये किल्ले रायगडअवचितगडटाळगडसुधागड असे अनेक किल्ले अगदी तासाभराच्या अंतरावर असल्याने या प्रक्षिणासाठी उत्तम ठिकाण राहील यावर चर्चा करण्यात आली.

Post a comment

0 Comments