महाराष्ट्र शासन कृषी विभाग पैठण यांचा राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम संपन्न.पैठण,दि २६.सोमवार : 
पैठण महाराष्ट्र शासन कृषी विभाग पैठण यांच्या कडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान आरोग्य पत्रिका कार्यक्रम सन-2020-21 साठी नुकताच तालुक्यातील मौजे घारी व कावसान या दोन गावांत घेण्यात आला.
यामध्ये जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांचे व सेंद्रिय खताचे उपयोगा संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.

हा कार्यक्रम घारी व कावसान या दोन गावात नुकताच घेण्यात आला. यावेळी आसपास चे चांगतपुरी, सोनवाडी, तेलवाडी, जायकवाडी, कावसान शिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे, कृषी पर्यवेक्षक  बी.बी. लघाने, कृषी सहाय्यक व्ही.बी. वाघमारे यांनी शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन केले.         
सध्या अवेळी पडणारा पाऊस, त्यातच वारंवार प्रत्येक वर्षी केलेली नांगरणीमुळे जमिनीची उलथापालथ तन नाशकांचा अतिवापर मातीतील किडींची वाढ, 
अशा अनेक कारणांमुळे जमिनीची आरोग्य क्षमता ढासळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य क्षमता चांगली राहण्यासाठी पिके घेतांना एकच प्रकारचे पीक वारंवार न घेणे खते व पाणी योग्य वेळी देणे, शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पिका व्यतिरिक्त इतर तणांची वाढ होत नाही, शक्यतो तन नाशकाचा वापर टाळावा, रासायनिक खते माती परीक्षण करून, आवश्यक असलेला घटक द्यावा, शेण खत, सेंद्रिय खत चांगल्या प्रमाणात वापरावे, अनेक प्रकारे जमीनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावे. 

Post a comment

0 Comments