हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात, रुग्णांच्या आकड्यात कमालीची घट

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत कोरोना आटोक्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईत गणेशोत्सवापासून कोरोनाचा आकडा हा २००० पार गेला होता. मात्र मुंबईत काल (२६ ऑक्टोबर) ८०४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मुंबईत गणेशोत्सवापासून त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचा रुग्णांमध्ये वाढ होत होती. मुंबईत दर दिवशी जवळपास २००० हून अधिक कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र सद्यस्थितीत या आकड्यात घट झाली आहे. काल मुंबईत ८०४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

Post a comment

0 Comments