संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या वर्षीचा गळीत हंगाम आठ दिवसांत चालु करणार.पैठण, दि २६ रविवार : पैठण तालुक्यातीक संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम ८ दिवसात चालू करणार असल्याची माहिती सचिन घायाळ शुगर मिल चे चेअरमन सचीन घायाळ यांनी माध्यमांना दिली. ६०० टायर गाड्या, १५० जुगाड, ७० वाहन टोळी या 
प्रमाणे ऊसतोड वाहतूक यंत्रणा गळीत हंगाम २०२०-२१ तयार करण्यात आली आहे. यावर्षी जवळपास १३ कोटी रुपये खर्च करून सचिन घायाळ यांनी कारखान्यात यंत्र सामग्री आणून आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. ४० वर्षा नंतर बॉईलर ची क्षमता वाढवण्यात अली आहे. या वर्षी ३.५० लक्ष मेट्रिक टन उसाचे गळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती सचिन घायाळ यांनी माध्यमांना दिली आहे. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन गोपी नाना गोर्डे, संचालक आबासाहेब मोरे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments