वातानुकूलित रेल्वेच्या डब्याला आग; पश्चिम रेल्वेची एसी लोकल सेवा आज बंद

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असणाऱ्या वातानुकूलित रेल्वेच्या डब्याला गुरुवारी रात्री कारशेडमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. ही वातानुकूलित ट्रेन मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये उभी होती. या ट्रेनला रात्री अचानक आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकारामुळे आज दिवसभर पश्चिम रेल्वेची एसी रेल्वे सेवा बंद राहणार आहे. 

 ट्रेनच्या डब्याने पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमान दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत साधारण पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी ही आग विझवली. या आगीत डब्यातील वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक कॅबिनेट जळून खाक झाले आहे. प्रवासी बसत असलेल्या भागात कोणतेही नुकसान झालेले नाही.

Post a comment

0 Comments