राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मीरा भाईंदर जिल्हा प्रभारीपदी पैठणचे भुमिपुत्र ॲड.प्रमोद सरोदे यांची निवड


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)-
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिरणीस तथा कार्यालयीन सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची मीरा भाईंदर जिल्हा प्रभारी पदी निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख यांनी केली. पैठणचे रहिवासी असलेले अँड .प्रमोद सरोदे यांचे अभिनंदन तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते दत्ताभाऊ गोर्डे व स्थानिक नगरसेवक जितु परदेशी, ज्ञानेशवर घोडके यांनी केले. यावेळी पैठण तालुक्याचे राष्ट्रवादी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हिते.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा.मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख कार्याध्यक्ष सुरज चव्हाण व रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड . प्रेमोद सरोदे याच्या पक्ष कार्याची दखल घेऊन त्याची मीरा भाईंदर जिल्हा प्रभारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष व संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांचे मोठे संघटन उभारणीसाठी आपण जीवाचे रान करणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुरोगामी व राष्ट्रवादी विचारांना समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचा आपला संकल्प असल्याचे अँड . सरोदे यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments