अखेर मनसेच्या प्रयत्नांना यशवैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


 समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याचे काम अखेर खुप मोठ्या मनसे च्या संघर्षामुळे आज वैजापूरात सुरू झाले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर कामासाठी वेळोवेळी रस्ता रोको, धरणे आंदोलन व शेवटी समृद्धी महामार्गच्या मस्की ऑफिस वर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. 
पर्यायाने समृद्धी महामार्गाचे  अधिकारी वर्ग मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केलेल्या संघर्षामुळे नमले व आज अखेर लाडगाव रस्त्याचे काम चालू झाले...
या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मनोज लेंगे,सरपंच बाबासाहेब पा.  लांडे, संदिप वाळूंज, गणेश बहाळस्कर, राहुल कांबळे, सिताराम पानकर, अमोल काळे,बाळू फणसे, शाहू काळे, रुषी सांळूके, अनिकेत रोठे, सार्थक सोनवने आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a comment

0 Comments