हे सरकार जे हवे ते करत नाही, नको त्या गोष्टीत लक्ष घालत आहे - विनायक मेटे

मुंबई:- राज्यात मराठी आरक्षणाचा मुद्दा चांगला गाजत आहे. आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे व्हावी असे राज्य सरकारकडून म्हटले जात असले तरी घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला पत्रच दिले नसल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने कोर्टात अर्ज सादर केलाच नाही, त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही असा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात आहे.

मराठी आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले जावे असे राज्य सरकार म्हणत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हान यांनीही हीच मागणी केली आहे. पण ७ तारखेलाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी घटनापीठ स्थापन करण्यासाठी अर्ज करण्यास राज्य सरकारला सांगितले होते. पण आज सुनावणी सुरू होईपर्यंत हा अर्ज राज्य सरकारने कोर्टासमोर सादरच केला नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

Post a comment

0 Comments