आज पुन्हा दोन्ही दादा एकत्र...पुणे येथे पार पडली विशेष बैठक...सकारात्मक कार्यवाहीचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश...


निलेश जांबले
दौंड-पुणे...
दौंड तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा मा. ना. अजितदादा पवार साहेब यांचे समवेत बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक पार पडली होती त्यानुषंगाने आज विभागीय आयुक्त कार्यालय , पुणे येथे विशेष बैठक पार पडली. याबैठकीस विभागीय आयुक्त मा. सौरभ राव, जिल्हाधिकारी मा. डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. अभिनव देशमुख, माजी जलसंपदा सचिव व मुळशी समितीचे अध्यक्ष मा. अविनाश सुर्वे , कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ मा. राजपूत , मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे मा.गुनाले , अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ मा. निलेश भोईर , कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग मा. श्री. विजय पाटील, पुणे विभागाचे उपवन संरक्षक मा. राहुल पाटील, अधीक्षक अभियंता जलसंपदा मा. चोपडे आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली त्यामध्ये प्रामुख्याने - 

१. कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीजनिर्मिती साठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोऱ्यात वळविण्यात येणारे पाणी (मुळशी धरणाचे पाणी) टप्प्या टप्प्याने कमी करण्यासाठी समितीचे अहवाल व शिफारशी विचारात घेऊन त्यासंबंधी निर्णय प्रक्रिया गतिमान करून मुळचे पूर्वमुखी असलेले मुळशी धरणाचे पाणी वळविणे बाबत कार्यवाही व्हावी. 

२. खडकवासला धरणाचे नवीन मुठा उजवा कालवा, जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल ) , भिगवण शाखा कालवा(BBC) यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, त्यामधून मोठ्या प्रमाणवर पाणी गळती होत आहे. त्याची दुरुस्ती, अस्तरीकरण व पोटचाऱ्यांची कामे आदी प्रस्तावांना कृष्णा खोरे विकास महामंडळ (नियामक मंडळाच्या) बैठकीत मान्यता मिळाली असून विशेष दुरुस्ती अनुदान अंतर्गत हि कामे तातडीने सुरु करावीत. 

३. शेतकऱ्यांना वाटप करण्यात परंतु अद्याप निर्वणीकरण न झालेल्या वन जमिनींवरील राखीव वने शेरा हटविणेसाठी शेतकऱ्यांना मोठ्या कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत असून निर्वनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात व स्वतंत्र यंत्रणा किंवा एजन्सी नेमण्यात यावी.

४. दौंड तालुक्यात (जि. पुणे) दि. १४ व १५ ऑक्टोबर २०२० रोजी सुमारे ८१५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला असून, यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तालुक्यातील ठीक ठिकाणी रस्ते, छोटे पुल व बंधारे वाहून जावून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे व त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थसंकल्प २०२० – २०२१ व इतर सर्व प्रकारच्या कामांना दिलेली स्थगिती तात्पुरत्या स्वरुपात उठवून दौंड तालुक्यातील मंजूर असलेले रस्ते ,बंधारे व पूल यांच्या कामांना परवानगी द्यावी. 

५. दौंड तालुका क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीच्या कामासाठी  जिल्हा नियोजन मंडळाद्वारे (DPDC) द्वारे १ कोटी निधीची तरतूद व्हावी. 

आपल्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागांद्वारे सकारात्मक कार्यवाहीचे आदेश देण्याचे आश्वासन मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिले.

Post a comment

0 Comments