पाचोड “येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेची घेतली शपत


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन) :---
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणुन प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, यामुळे“माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची सुरूवात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेली आहे.पाचोड ता.पैठण येथे शिवछत्रपती कला महाविद्यालयातील नॅक विभागामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोरोना फैलाव थांबविण्यासाठी मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक आंतर या गोष्टी स्वतःच्या बरोबर कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. असे डॉ. शिवाजी यादव यांनी सांगितल्या नंतर  विद्यार्थ्यांना सोबत महाविद्यालयीन कर्मचारी यांना "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियानाची शपत घेण्यात आली आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश नलावडे, प्रा.डाँ.संतोष चव्हाण, डॉ. ह. सो. बिडवे,  प्रा.डॉ.विठ्ठल देखणे, उमाकांत भोसले, गजानन गवारे हे उपस्थिती होते.

Post a comment

0 Comments