जन मंगल संघाच्या वतीने नवनियुक्त तहसीलदार विक्रम राजपूत यांचे पुस्तक देऊन स्वागत.

सिल्लोड  (प्रतिनिधी) :- सिल्लोड येथील तहसीलदार रामेश्वर गोरे यांची बदली झाल्यामुळे नवीन रुजू झालेले नवनियुक्त तहसीलदार विक्रम राजपूत यांचा जन मंगल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जन मंगल संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे,सदस्य उत्तम ताठे, पंढरीनाथ ताठे ग्रा.प सदस्य गेवराई शेमी आदी उपस्थित होते.
 यावेळी जन मंगल संघाच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर असणारे महापुरुषांची विचारधारा हे पुस्तक देण्यात आले.जन मंगल संघाची भूमिका, कार्य, उद्दिष्टे याविषयीची सविस्तर माहिती नवनियुक्त तहसीलदार विक्रम राजपुत यांना देण्यात आली.तालुका अध्यक्ष जयराज जिवरग पाटील, महासचिव प्रसिद्धी प्रमुख कृष्णा तोतरे, तालुका प्रवक्ता जाफर शहा, सचिव अविनाश दांडगे, संघटक आकाश शेजुळ, सुभाष नवतुरे, उपाध्यक्ष दादाराव गोडसे, सुधाकर सांगळे 
 आदी संघटनेच्या पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments