महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भय्ये" माफी मागणार का? - जितेंद्र आव्हाड

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

‘सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर विचारला आहे. 

Post a comment

0 Comments