योगेश सोलाटे यांचा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा ,पैठण भाजप मध्ये नाराजी नाट्य सुरू
पैठण ( प्रतिनिधी विजय खडसन):--पैठण येथे दि.३० सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर झाली, ती कार्यकरिणी जाहीर करतांना पैठण तालुक्यातील ज्येष्ठ नेते यांना डावलून कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने तालुका अध्यक्षांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश सोलाटे यांनी दि.३ आक्टोबर २०२० रोजी .रावसाहेब दानवे, सार्वजनिक डिटर्न राज्यमंत्री भारत सरकार यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केल्याचे योगेश सोलाटे यांनी सांगितले.
तालुक्यात बहू संख्येने लोकसंख्या असलेल्या ओबीसी पैकी काही व दलित समाजातील पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान न दिल्याने व शहरातील पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात नेमणूक करण्यात आली. सतत होत असलेल्या गतबाजीमुळे भविष्यात भारतीय जनता पार्टीचा विस्तार संपूर्ण पैठण तालुक्यात कसा होईल अशी शंका येत असल्याने मी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे योगेश सोलाटे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. 

-----------------------------------------------------------------------
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे , मा.श्री.हरिभाऊ बागडे नाना, मा. पंकजाताई मुंडे, मा. खा.भागवत कराड साहेब, मा. श्री.प्रविनजी घुगे दादा यांची मला सुख दुःखात जी साथ लाभली त्या बद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे...

                 योगेश सोलाटे....
     भाजपा युवा मोर्चा पैठण 
     तालुका अध्यक्ष

Post a comment

0 Comments