नवरात्रीच्या तिसऱ्या माळीच्या रंगाचे महत्व

औरंगाबाद (योगिता बनसोडे):- यंदा १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढील काही आपल्याला नवनव्या रंगांची उधळण पाहायला मिळणार आहे. यावेळी दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग जास्त असोत. यंदा नवरात्रोत्सवचा पहिला रंग हा करडा (Gray) आहे. तर दुसऱ्या दिवसाचा रंग हा केशरी (Orange) होता तर आजचा रगं म्हणजेच तिसऱ्या दिवसाचा रंग पांढरा (White) आहे. 

पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे. शांतता, स्वच्छता, पवित्रता आणि ताजेपणा ही देखील पांढऱ्या रंगाची वैशिष्ट्ये आहेत. नवरात्रीत नऊ दिवसांच्या नव रंगांना खुप शुभ मानले जाते. विरता आणि सौम्यता या दिवशी आरधनेने प्राप्त होते.
शारदीय नवरात्रौत्सव ची आज तिसरी माळ. आज देवी चंद्रघंटा या रूपात आहे. तिच्या कपाळावर घंटेच्या आकाराची चंद्रकोर आहे म्हणून चंद्रघंटा देवी या नावाने ओळखले जाते. राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीने हे रूप धारण केले होते. या देवीची पूजा केल्याने शांती आणि समृद्धी मिळते.

आजचा रंग - पांढरा 
(सैजन्य:- इंस्टाग्राम)

शुभ्र रंग हा असा 
धवल आणि शांत... 
गरज ज्याची भासे
जागी आजच्या नितांत 
स्वच्छतेचा रंग पांढरा,
पारदर्शकतेचा रंग पांढरा 
रंग पांढरा नितळ स्वच्छ मनाचा... 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a comment

0 Comments