कुमकुम भाग्य’ या मालिकेत ‘इंदू दादी’ अभिनेत्रीचे निधन

मुंबई : एकीकडे कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तरीही काळजी घेत मालिकांच्या सेटवर चित्रीकरण सुरू आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे यासाठी कलाकारदेखील शक्य तितकी काळजी घेऊन काम करत आहेत. यातच हिंदी मालिका विश्वावर पुन्हा एक शोककळा पसरली आहे. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत ‘इंदू दादी’ साकारणाऱ्या अभिनेत्री जरिना रोशन खान यांचे निधन झाले आहे.

मुंबईतील राहत्या घरी कार्डियाक अरेस्टमुळे पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ५४ वर्षीय जरीन खान यांचे ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील ‘इंदू दादी’ हे पात्र विशेष गाजले होते. या मालिकेतील त्यांचे सहकलाकार शब्बीर अहलुवालिया आणि श्रिति झा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली.

Post a comment

0 Comments