सुनिलजी तटकरे साहेब पुण्याई तुमच्या गाठीशी, जनता तुमच्या पाठीशी - युवती जिल्हा अध्यक्षा सायली दळवी .


  


 रायगड दि. ३० शुक्रवार : रायगड व रत्नागिरी आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब अगदी कठीण काळात रायगडच्या जनतेमध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू त्याचबरोबर कोकणात आलेल्या निसर्गचक्री वादळ त्यामध्ये झालेल्या नुकसानभरपाई पाहणी करण्यासाठी ते पूर्ण रायगड व रत्नागिरी फिरले, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आला. नुकतीच त्यांनी कोरोना चाचणी केली असता.तिचा रिपोर्ट हा पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वत्र जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 
        सुनिलजी तटकरे ह्या आजारातून पूर्णतः मुक्तता व्हावी या करता कालिकादेवी मंदिर, कडापे येथे जाऊन देवीची ओटी भरली व उत्तम आरोग्यासाठी देवीकडे प्रार्थना युवती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला पदाधिकारी व युवक कॉग्रेसच्या नेते वर्गानी केली.
       
         
            यावेळी रायगड जिल्हा युवती अध्यक्षा अँड.सायली दळवी यांनी विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, तटकरे साहेबांनी रायगड जिल्ह्यातील जनतेचे कोरोना लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याचे एक कुटुंब प्रमुख मोलाची जबाबदारी पेलून सर्वाना हक्काचा मदतीचा हात दिल्याने अनेकांना या काळात साहेबांच्या रुपाने मोठी मदत मिळाली. या काळात साहेबांनी स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता जनतेचे निस्वार्थीपणे काम केले, परंतु साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न केल्याने साहेबांना कोरोनाची लागण झाली असून साहेबांची कोरोनातून लवकर लवकरात मुक्ति व्हावी यासाठी आम्ही सर्व युवक कॉग्रेसच्या वतीने कालिकादेवी मंदिर, कडापे येथे देवीची पुजा अर्चा करीत देवीला साकडे घालत साहेबांना कोरोना मुक्त लवकर कर अशी प्रार्थना केली. जेणेकरून साहेब पुन्हा रायगडकरांच्या सेवेत लवकरात लवकर येऊन अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील, आणि सर्वसामान्यांना हक्काची लोकप्रतिनिधी पुन्हा सेवेत मिळेल, असे मत युवती अध्यक्षा अँड.दळवी यांनी व्यक्त केले.

Post a comment

0 Comments